महिलेला सर्पदंश,प्रकृती स्थिर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :धान रोवनीच्या कामावर गेलेल्या महिला मजुराला शेतात अचानक सर्पदंश झाल्याने गंभीर जखमी झाल्याची ही घटना २३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता च्या सुमारास मुरमाडी येथील शेत शिवारात घडली असून प्रमिला हेमराज लांजेवार (५३)रा . मुरमाडी ता . लाखांदूर असे जखमी महिलेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मुरमाडी येथीलमहिला मजूर प्रमिला हेमराज लांजेवार हे आपल्या गावातीलचश्री बगणू लांजेवार यांच्या शेतात धान रोवणीच्या मजुरीवर गेली होती. धान रोवणी करीत असताना अचानक सर्पदंश झालयाची माहिती सोबत असलेल्या महिलांना कळताच महिला सदर जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आला. सदर महिला धोक्याचा बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ .दत्तात्रय ठाकरे यांनी सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *