सिंदेपार येथील अपहरण झालेल्या व्यक्तीची तिरोडा येथुन सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/लाखनी : लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सिंदेपार येथील एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची तक्रार लाखनी पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यावर लाखनी पोलिसांनी तिरोडा तालुक्यातील बीडची येथून आरोपीस ताब्यात घेऊन त्यांनी सांगितल्यानुसार तिरोडा येथील एका घरातून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार लाखनी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी ओमित येळेकर यांनी दिलेले तक्रारीनुसार त्याचे वडीलाचे ओळखीचे व्यक्तिने तिरोडा येथील एका व्यक्ती कडून काही रक्कम उधार घेऊन परत केली नाही मात्र हि व्यक्ती मरण पावल्याने सदर व्यक्तीने ही रक्कम माझे वडीलांनी द्यावी अश्या आशयाची मागधी करुन माझे वडील नरेश मारोती येळेकर यांचे अज्ञात आरोपीने अपहरण केल्याची तक्रार २३ जुलै रोजी दिल्यावरून लाखनी पोलिसांनी भादवि कलम ३६५,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा नोंद करून मिळालेले गुप्त माहितीनुसार आरोपी तिरोडा तालुक्यातील असल्याचे समजल्यावरुन तपासकामी फिर्यादी सह येवून फिर्यादीने आपले वडीलांचे मोबाईलवर फोन केला असता अनोळखी व्यक्ती फोनवर बोलला असता आम्ही पैसे घेऊन आलो आहोत असे सांगितले असता त्या व्यकतिने बिरसी येथे आधार पत संस्थे जवळ असल्याचे सांगितले.

वरुन तेथे गेले असता सदर व्यक्ती फोनवर बोलत समोर आली असता लाखनी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपले नाव धिरज प्रकाश बरियेकर तिरोडा असल्याचे सांगून अपहरण झालेल्या नरेश येळेकर यांना तिरोडा येथील पुण्यनगरी वस्तीत राजकुमार हरिणखेडे यांचे घरी ठेवले असल्याचे सांगितले. त्यानुसार तिरोडा येथे आरोपिसह येऊन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुस्थितीत सुटका करून घटना स्थळांचा पंचनामा सिदेंपार येथील पोलीस पाटील ज्योति राजेश येळेकर व ग्राम पंचायत सदस्य सतिश बिसेन यांचे समक्ष करून आरोपी धिरज बरियेकर यास घेऊन लाखनी येथे घेउन गेले असुन आणखी आरोपींचा शोध लाखनी पोलीस घेत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *