अपघातात सायकलस्वार ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : सायकलने रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात एका ७० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या घडली. लाखांदूर येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ हा अपघात झाला. पांडूरंग डोमा नाकतोडे (७०, लाखांदूर) असे घटनेतील मृत इसमाचे नाव आहे. पांडूरंग नाकतोडे हे आपले काही कामकाज आटोपून सायकलने रस्ता ओलांडत होते. याच वेळी साकोलीकडून वडसामार्गे तांदूळ घेऊन जाणाºया टेम्पोची (एमएच ३४ एबी ६६३५) धडक त्यांना बसली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी लाखांदूर येथीलग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. लाखांदूर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वृद्धाचे नियंत्रण सुटले, अन घडला अपघात

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सायकलने रस्ता ओलांडणाºया पांडूरंग नाकतोडे यांचे अचानकपणे सायकल वरून नियंत्रण सुटले. हे लक्षात येताच टेम्पो चालकाने पूर्णत: वाहन नियंत्रणात आणले, मात्र सायकलस्वार अचानकपणे टेम्पोसमोर आल्याने जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी वाहनाच्या समोरील काच फुटली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *