तुमसर नगरपालिका विरोधात राष्ट्रवादीचे आमरण उपोषण सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नगरपालिकेत झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारा विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करुन चौकशी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तुमसर न प. मार्फत शहरात लावण्यात आलेल्या लोखंडी खुर्ची खरेदी प्रकरणात झालेला भ्रष्टाचार तुमसर शहर नगरपरिषद शाळेत डिजिटल वर्ग शाळांच्या नावाखाली लाखों रुपयांच्या टेंडर काढून भ्रष्टाचार व ४७ करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याचे सांगूनही आजपर्यंत लोकांना पाणी पुरवठा न होत असल्याबाबदचे कारण व अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम करुन करोडो रुपयांच्या बिल काढून भ्रष्टाचार केला. असल्याचा आरोप निवेदनातुन केला. त्याच बरोबर तुमसर शहरात बायो गॅस प्लांट नावाखाली कोणतेही कार्य न करता किंवा त्यापासून शहराला कोणताही फायदा होत नसतांना सुध्दा लाखो रुपयांचे बिल काढून भ्रष्टाचार केला आहे.

तसेच तुमसर नगरपरिषद येथील अग्निशामक वाहन जीर्ण अवस्थेत असून सुध्दा, अग्निशामक वाहन न घेता त्या पैशाला कपटपूर्वक दुसरीकडे वळवून, फायरमॅन नसतांना फायरमॅन करता ईमारत बांधकाम करण्यात आली आहे. त्यात झालेल्या अनियमितता व भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करावी व ट्री-गार्ड खरेदी करणे व झाडे लावणे या कामात काम न करता बिल काढणे, गार्ड खरेदी करणे व झाडे न लावता खर्चाच्या नावावर लाखों रुपये वैशीष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त फंडातून गैर कायदेशीर रकमेची उचल करणे आदीतुमसर नगरपरिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पासून नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यात माजी नगरसेवक सलाम तुरक,जिल्हाध्यक्ष संताजी युवा ब्रिगेड विक्रम लांजेवार, तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष सुनील थोटे, राकेश धार्मिक, गोवर्धन किरपाने, तिलक गजभिये इत्यादी उपोषणकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.