नदीच्या पुरामुळे शेतपिकांची मोठी हानी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा, जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येऊन शेतमालाची मोठी हानी झाली असतांना पूरपीडित गावांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. चालू सप्ताहात दमदार पाऊस झाल्याने नदी, नाले ओथंबून भरलेत. परिणामी संजय सरोवर, पुजारीटोला, बावनथडी, धापेवाडा, गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदी नाल्याच्या पुराचे पाणी शेतजमिनीत घुसून शेतपिके पाण्याखाली आलीत. यासह नदी काठावरील गावांनाही पुराचा फटका बसला असून घरांची देखील अंशत: पडझड झाल्याचे कळते. सदर स्थिती भंडारा जिल्ह्यातील शेतपिकांची असून शेतकºयांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यानकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी पूरग्रस्त गावांच्या भेटी घेऊन प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाहणी केली असता शेतातील उभे असलेले धान पीक व सोयाबीन पिक पूर्णत: पाण्याखाली आल्याचे दिसले. सध्या धानपिक गर्भाशयात असून काही ठिकाणी लोंबी देखील यायला लागली होती. ऐन कापनीच्या वेळी झालेली नुकसान शेतकºयांना आर्थिक संकटात नेणारी असून सोयाबीन व कापूस पिकांची नुकसान देखील शेतकºयांना विवंचनेत टाकणारी आहे.यासोबतच इतर पिकांची देखील प्रचंड हानी झाल्याचे सांगण्यात आले. ही परिस्थिती केवळ पवनी तालुक्यातच नव्हे तर तुमसर, मोहाडी, लाखांदूर, भंडारा तालुक्यात असल्याचे वास्तव आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *