स्वच्छता ही कवळ घरात नव्ह तर गावात असायला हवी!

भंडारा : प्रत्येक घरात दैनंदिन स्वच्छता होते. त्यामुळे घरी कचरा आढळून येत नाही. परंतु स्वच्छता ही फक्त घरात नव्हे तर परिसरात, शाळेत, सार्वजनिक ठिकाणी आणि गावात असायला हवी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सोनटक्के यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जि.प.भंडारा व पंचायत समिती भंडारा व ग्राम पंचायत बेला यांचे वतीने आज रविवारी स्वच्छता ही सेवा श्रमदानाचा जिल्हास्तरीय शुभांरभ बेला येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) एम. एस. चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सोनटक्के, भंडारा पंचायत समितीच्या सभापतीसौ. रत्नमाला चेटूले, गट विकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, माजी जि.प. सभापती संजय गाढवे, गट शिक्षणाधिकारी श्री राठोड, विस्तार अधिकारी श्री कुथे, श्री. तिडके, धांडे, ग्राम विकास अधिकारी खोब्रागडे, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, अंकुश गभने, बबन येरणे, राजेश येरणे, तालुका कक्षाचे नागसेन मेश्राम, स्मृती सुखदेवे आदींची उपस्थिती होती. चूल आणि मूल स्वच्छ ठेवीन असे ठरविले तर मूल निरोगी राहील याची खात्री देता येत नाही.

आपल्या घराशेजारी डास माशांची उत्पत्ती झाली तर त्यापासून विविध आजार होतात, या गोष्टीची जाणीव सगळ्यांनाच आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्याकरीता नवनीवन तंत्रज्ञान येत आहे त्याचा वापरगावस्तरावर व्हायला हवा. अस्वच्छतेचा परिणाम शरीरावर दिसतो. पाण्याच्या स्त्रोताजवळ अस्वच्छता असेल तर स्त्रोत बाधित होतो. त्याचा परिणाम शरीरावर जाणवतो. स्वच्छतेच्या जागृतीकरीता विद्यार्थ्यांची मोठी जबाबदारी आहे. नुसत्या हात धुण्याने ८० टक्के आजार पळून जातात. शौचाहून, स्वयंपाक केल्यानंतर आणि बाहेरून काम करून आल्यानंतर हात धुतले तर आरोग्य सुदृढ होईल. नुसत्या पाण्याने हात धुण्याचा फायदा नाही. आपण स्वत: हात धूवून कुटुंबियांना हात धूण्याकरीता बाध्य केले पाहिजे. आपण स्वत:ची काळजी घेतली तर आरोग्यासोबतच आरोग्यावर खर्च होणारा पैसा वाचेल. स्वच्छता प्रत्येकांनी अंगीकारली पाहिजेत. स्वत:पासून स्वच्छतेची सुरूवात केली पाहिजे. त्यामुळे गावे कचरामुक्त आणि सांडपाणी मुक्त करता येतील.

याकरीता गावस्तरावर व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करून गावेकचरामुक्त करणे आवश्यक असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), पं. स. सभापती, गट विकास अधिकारी आदींनी स्वच्छता ही सेवा च्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्राम पंचायत सभागृहात आयोजित श्रमदान शुभारंभाप्रसंगी विद्यार्थी, बचतगटाच्या महिला, नागरिकांना स्वच्छता शपथ देण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमानंतर ग्राम पंचायत कार्यालयापासून ते प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेच्या कार्यालयापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. भजन किर्तनाने निघालेल्या रॅलीत विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छता रॅलीनंतर गावाच्या शेवटी प्रादेशीक पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालय परिसरात स्वच्छता श्रमदान करण्यात आले. या ठिकाणावरील प्लॉस्टीक गोळा करण्यात आली. परिसरात स्वच्छता करण्यात आली. प्लॉस्टीक कचºयामुळे नालीतील थांबलेले पाणी कचरा बाहेर काढून पूर्ववत करण्यात आली. महिला स्वच्छता केल्यानंतर एकत्र झालेला सर्व कचरा वाहनाद्वारे संकलीत करण्यात आला. याच परिसरात विविध वृक्षांचे रोपटी लागवड करण्यात आली. स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाला बेला येथील विद्यार्थी, ग्राम पंचायत पदाधिकारी, साई, प्रगती,प्रतिज्ञा, दामिनी, लक्ष्मी, जिवन्नोनती, शांती, संघटन, अविरल, स्नेहा, आस्था, संबोधी, प्रबुध्द आदींसह अन्य महिला बचतगट व नागरिकांची उपस्थिती लाभली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *