पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शुक्रवार पहाटेपासूनच पावसाने जोर धरला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सततच्या पावसामुळे जलाशये, तलाव आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आमगाव- गोंदिया मार्गावरील पांगोली नदीच्या पयार्यी पुलावरून पाणी जात असल्यामुळे शनिवारी आणि आज रविवारी सलग तिसºया दिवशीही वाहतूक बंदच आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पूर ओसरला तरी रविवारी देखील वाहतूक सुरू होणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता . मध्यंतरी पावसाने दीर्घ हुलकावणी दिली होती. त्यामुळे धानपीक धोक्यात आले होते. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत असल्याचे दिसून आले होते. मात्र तान्हा पोळयाच्या दिवशी शुक्रवारी पावसाने दमदार कमबॅक केला. दिवसभर आणि दुसºया दिवशी शनिवारी देखील पाऊस झाला. त्यामुळे शिवार जलमय झाले. तलाव, नद्या, नाल्यांतील पाणी पातळीत वाढ झाली. पांगोली नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. शुक्रवारी सकाळपासून आमगाव- गोंदिया मार्गावरील पर्यायीपुलावरून चार फूट पाणी वाहू लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. आमगाव मार्गावरील वाहतूक तुमखेडा आणि चुलोद मागार्ने वळविण्यात आली.

रविवारीदेखील पांगोली नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक सध्या बंद आहे. पर्यायी मार्गापैकी काही भाग पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर वाहूनगेला. पाणी पातळीत वाढ सुरू असल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे वक्रद्वार उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कासा, डांगोरली, काटी, बिरसोला आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांसह पूरग्रस्त भागाची पाहणी करून सूचना दिल्या. तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक मागार्नादेखील त्याचा फटका बसला आहे. तिरोडा तालुक्यातील मरारटोला ते करटी आणि घोगरा ते घाटकुरोडा या मार्गावरील नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने पहारा लावला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.