पुण्याचे प्रकाश पाटील यांचा सायकलने जनजागृती अभियान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : आॅगस्ट पासून पुण्यावरून सायकलने निघालेले ६७ वर्षीय प्रकाश पाटील यांनी सहा हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा संकल्प घेत काल १६ सप्टेंबर रोजी भंडाºयावरून सायकलने सिहोरा मार्ग चांदपूर देवस्थान गाठले. सिहोरा येथील प्रतिष्ठित मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक विजय हिवरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी हिवरकर परिवार आणि मित्रमंडळींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केला. प्रकाश पाटील बोलताना म्हणाले, मी पुढे गोंदिया, आनंदवन, चंद्रपूर, गडचिरोली मार्गे महाराष्ट्रातील काही भागात सायकलने भ्रमण करणार आहे.

यापूर्वी मी पुणे-नेपाळ, पुणे ते कन्याकुमारी- रामेश्वरम, पुणे ते गोवा, पुणे ते तिरुपती बालाजी, पुणे ते स्टेट युनिटी व प्रत्येक वर्षी महिन्याला पंढरपूर वारी व देशातील १६ राज्यात सायकल द्वारे भ्रमंती करून जनजागृती केली आहे असेही ते म्हणाले. प्रकाश पाटील हे काल १६ सप्टेंबर रोजी सायकल द्वारे पर्यावरण जागृती, वृक्ष संवर्धन व जलसंवर्धनाचा संदेश देण्याकरिता महाराष्ट्र भ्रमंतीवर निघालेले प्रकाश पाटील यांचे सिहोरा येथे आगमन झाल्यावर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात सायकलने भ्रमण करून जनजागृती करण्याचा संकल्प घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील माती व पाण्याचा संग्रह करून प्रत्येक जिल्ह्यात एक झाड लागवड करण्याचा त्यांचा संकल्प आहे. तो संकल्प घेऊनच महाराष्ट्रभर सायकल द्वारे भ्रमंती करीत आहेत. तत्पूर्वी त्यांनी चांदूर देवस्थानात हनुमंताचे दर्शन घेतले हे यात उल्लेखनीय आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *