वर्गात घोरपड शिरल्याने एकच धावपळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोबरवाही:- तुमसर येथील पब्लिक स्कुल या खाजगी शाळेत तासिका सुरू असतांना अचानक घोरपड शिरल्याने एकच गोंधळ उडाला.शाळेतील विद्यार्थी,शिक्षीका व इतर कर्मचारी यांच्या कल्लोळाने घोरपड शाळेतुन पळुन गेली. तुमसर पब्लिक स्कूल या खाजगी कॉन्व्हेंट मध्ये सकाळी ८.३० वाजताची प्रार्थना आटोपुन प्रथम तासिका सुरू असतांनाच इयत्ता ४ थ्या वर्गात शिक्षीका विद्यार्थ्यांना शिकवित असतांनाच काही विद्यार्थ्यांचे लक्ष वर्गातील लोखंडी टिनाच्या छताकडे गेले.तिथे विद्यार्थ्यांना घोरपड दिसुन आल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आरडा-ओरड सुरू केली तिथे उपस्थित शिक्षीका तारिका देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सांभाळीत वर्गाच्या बाहेर काढले.

शिक्षीकेने दिलेल्या माहितीनुसार अंदाजे एक ते तीन फूट लांबी असणारी घोरपड आपल्या तोंडात पाल(छिपकली) घेऊन भिंती वरून जात होती. त्याच दरम्यान शाळेतील इतर कर्मचारी सुध्दा वर्गात एकत्र गोळा झाले. घोरपड पकडण्या करिता एकाव्यक्तीला बोलाविण्यात आले मात्र पर्यंत घोरपड वर्गामधून बाहेर पळुन गेली. तुमसर पब्लिक स्कूल ही शाळा मोकळ्या जागेत असून शाळेच्या अवती भवती झाडी झुडपी मोठया प्रमाणात असल्यामुळे साप , इंचू , घोरपड या सारखे अन्य जीवजंतु शाळेमध्ये सहज प्रवेश करू शकतात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता शाळेमार्फत पटांगण आणि इमारतीच्या सभोवताल ब्लिचिंग पावडरच्या शिडकाव व जंतुनाशक औषधी ची फवारणी करणे गरजेचे आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.