पर्यावरण पूरक कापडी पिशव्याचे आठवडी बाजारात मोफत वितरण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी हीरक महोत्सवी वर्ष आणि महिला दिनाच्या औचित्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापक भगिनींनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वितरण दिनांक १२ मार्च २०२४ ला लाखनी येथील आठवडी बाजारात करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे यांनी प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जगभरात प्लास्टिक बंदी म्हणून सुरू करण्यात आलेली आहे.

प्लास्टिकचे निसर्गात विघटन होत नाही त्याचा पुनर्वापरही जास्त दिवस करता येत नाही आणि प्लास्टिकचा पुनर्निर्मित प्रकल्प उभारणे खर्चिक असल्याने त्या वाटेला जाणाºया उद्योजकांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. या सर्वावर रामबाण उपाय म्हणजे कापडी पिशव्यांची निर्मिती उद्योग तसेच भविष्याकरिता विद्यार्थिनींना स्वयंरोजगाराच्या दिशेने पहिले पाऊल म्हणूनही आम्ही हा अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे असे मार्गदर्शनातून सांगितले. याकरिता महाविद्यालयातील डॉ धनंजय गभने, डॉ सुरेश बंस्पाल, डॉ स्मिता गजभिये, डॉ संगीता हाडगे, डॉ सुनंदा देशपांडे, डॉ अर्चना मोहोड, प्रा रूपाली खेडीकर, प्रा लालचंद मेश्राम, प्रा बाळकृष्ण रामटेके, प्रा युवराज जांभूळकर आदी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *