वर्ष झाले अनेक, मोहाडी नगरवासी पाहत होते वाट!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील सुप्रसिद्ध जागृत माता चौंडेश्वरी देवी भुगभार्तून उगम पावलेली असल्याने भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे नवरात्रच्या वेळी लाखोच्या संख्येने भक्तगन दर्शनाकरिता येत असतात. त्यामुळे गैरसोय होत असल्याने मंदिरा समोरील नाल्यावर दोन्ही बाजूने घाटाचे बांधकाम करणेबाबत भारतीय जनता पक्षाच्या मोहाडी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या स्वाक्षरीनीशी खासदार सुनील मेंढे यांना दि.२२.५.२०२२ ला निवेदन दिले. व दि. ११.७.२०२२ ला छाया डेकाटे मोहाडीच्या नगराध्यक्ष यांनी देखील पाठपुरावा केला.तसेच भा.ज.पा. मोहाडी तालुका उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी दि. ३.१०.२०२२ ला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

व दि. २०.१०.२०२२ ला भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदनदिले होते. त्यामुळे त्यांनी विषयांकित प्रश्न्नी त्वरित दखल घेऊन त्यांचे कार्यालयीन पत्र क्र.१२१५ दि. ८.११.२०२२ अन्वये जिल्हाधिकारी भंडारा यांना सदर निवेदनावर योग्य ती दखल घेण्याबाबत तसेच निवेदनाच्या अनुषंगाने मौजा मोहाडी येथे चौंडेश्वरी मातेच्या मंदिरा समोरील नाल्यावर दोन्ही बाजूने घाटाचे बांधकाम मंजूर करण्याकरिता योग्य कार्यवाही करून सहकार्य करण्याबाबत संदर्भीय पत्रकातनमूद केले होते. सदर निवेदन मोहाडी तालुका भाजपा चे उपाध्यक्ष जगदीश निमजे यांनी मुख्यमंत्री सचिवालाय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांना दि. १६.३.२०२३ ला दिले.त्यामुळे जिल्हाधिकारी भंडारा यांचे कार्यालईन पत्र क्र. ६७/२०२३ दि. ३१.३.२०२३ अन्वये जिल्हा नियोजन अधिकारी भंडारा यांना सदर निवेदनावर उचित कार्यवाही करण्याबाबत कळविले असल्याने त्यांनी देखील त्यांचे कार्या. पत्र क्र. ६०४ दि. २७.४.२०२३ अन्वये कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग (जि.प.) भंडारा यांना विषयांकित कामाचा प्रत्यक्ष भेटीचा अहवाल व अंदाजपत्रक या कार्यालयास लवकरात लवकर सादर करण्यात यावे. जेणेकरून सदर काम मा.पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती भंडारा यांच्या अध्यक्षेखाली पुढील होणाºया जिल्हा नियोजन समितीच्या समोर मंजुरी करिता सादर करणे शक्य होईल. असे नमूद केले असल्याने लवकरच सदर घाटाच्या बांधकामाला मंजुरी प्राप्त होणार असल्याने संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील भक्त जणांचे सदर बाबीकडे लक्ष केंद्रित झाले आहे, एवढे मात्र नक्की.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.