जिल्हा नियोजन सदस्य पदी शिवसेना जिल्हा प्रमुखासह सहा जणांची नियुक्ती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशान्वये भंडारा जिल्हा नियोजन समितिच्या सदस्यपदी सहा लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, शहर प्रमुख मनोज साकोरे, नरेश ऊचीबगले, प्रशांत भुते, राजेंद्र ब्राम्हणकर व बाळकृष्ण फुलबंधे यांचे समावेश आहे. भंडारा जिल्हा नियोजन समिति तर्फे जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार केल्या जातो. या समिति मधे जिल्ह्याचे अधिकारी व पदाधिकाºयांचा समावेश केल्या जातो. ज्या मुळे जिल्ह्याच्या विकासाकरिता नवीन दुष्टिकोण लाभत असतात. जिल्ह्याचा विकास अधिक तीव्र गतीने व्हावा या दृष्टिकोनातून आम. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा व पवनी तालुक्यातील वरील सहा नवे सुचविली ज्यावर मुख्यमंत्री महोदयांनी शिक्कामोर्तब करून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, शहर प्रमुख मनोज साकोरे, नरेश ऊचीबगले, प्रशांत भुते, राजेंद्र ब्राम्हणकर व बाळकृष्ण फुलबंधे यांना जिल्हा नियोजन समितिच्या बैठकी करीता आमंत्रित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना एका पत्रा मार्फत दिले आहे. सर्व सहा सदस्यांनी त्यांची नियुक्ती केल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम. नरेंद्र भोंडेकर यांचे आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *