आशा स्वयंसेविका, पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. पोलीसपाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली असून आता त्यांना महिन्याला १५ हजार मानधन मिळणार आहे. आशा स्वयंसेविका मानधनात ५ हजार रूपयांची भरीव वाढ करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यास मंजुरी दिली. याशिवाय, अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाºयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाºयांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाºयांना फायदा होणार आहे. या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयाांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाºयाांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरिताचे सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन कंत्राटी कर्मचाºयाांचे आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या ३०0 टक्के प्रमाणात समायोजन केले जाणार आहे. तर ७० टक्के पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या कंत्राटी कर्मचाºयांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाºया मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाºयांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, मार्गदर्शन तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करुन समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.