लोकहिताचे निर्णय घेत राज्य सरकार सर्वसमावेशक असल्याचे दाखवून दिले – खा. मेंढे

भंडारा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी पोलीस पाटलांच्या आणि आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आलेला निर्णय राज्य शासनाने घेतला. यासोबतच इतरही कल्याणकारी निर्णय घेऊन राज्य शासनाने लोक हिताचे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. या कल्याणकारी निर्णयांसाठी राज्य शासनाचे आभार मानीत असल्याची प्रतिक्रिया खा. सुनील मेंढे यांनी दिली लोकसभा आचारसंहिता लागण्यापूवीर्ची राज्य शासनाची कदाचित शेवटची राज्य मंत्री मंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत राज्य शासनाने अनेक कल्याणकारी आणि लोकहिताचे निर्णय घेतले. अनेकांच्या मागील बºयाच महिन्यांपासून असलेल्या मागण्या या निर्णयामुळे पूर्ण झाले आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी पर्यटन स्थळाला तत्त्वत: मान्यता देत १९ कोटी ६० लक्ष ते ५३ हजार रुपये मिळालेले आहे. भंडारा जिल्ह्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन आता मिळणार आहे. आशा सेविकांच्या मानधनात ५ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी कर्ज घेण्याचा निर्णय, लहान शहरांमधील अग्निशमन यंत्रणा बळकट करण्यासाठी १५३ कोटीची तरतूद, भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत पन्नास वर्षे मुदतीचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय महत्वाचा आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाºयांना सेवेत घेण्याचा निर्णय अनेकांसाठी कल्याणकारी असा आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत शुभमंगल सामूहिक विवाह योजना अंतर्गत दिल्या जाणाºया अनुदानात करण्यात आलेली वाढ, मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे वाढविण्यात आलेले मानधन यासह इतर अनेक कल्याणकारी लोक व कर्मचारी हिताचे निर्णय या बैठकीत राज्य शासनाने घेतले आहेत. जनतेचे असलेल्या सरकारने बैठकीत घेतलेले आहे खºया अर्थाने अनेकांना दिलासा देणारे असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व मंत्रिमंडळातील सर्व सदस्य अभिनंदन पात्र असल्याचे खा. सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *