अखेर गडकरींंच्या नावाची घोषणा

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अखेर भारतीय जनता पक्षाने केली असून आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे.सलग दोन वेळा प्रचंड मतदाधिक्याने गडकरी नागपूरमधून विजयी झाल्याने भाजपच्या हमखास विजयी होणाºया जागेत नागपूरचा समावेश होता. त्यामुळे गडकरींचे नाव उमेदवाराच्या पहिल्या यादीत अपेक्षित होते. मात्र ते नसल्याने तर्कवितर्क लावले जात होते. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट गडकरींना मविआकडून निवडणूक लढण्याची ‘आॅफर’ दिली होती. बुधवारी पक्षाने जाहीर केलेल्या दुसºया यादीत गडकरींच्या नावाचा समावेश असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतच्या सर्व तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.