तुरुंगाची सुरक्षा आणखी बळकट होणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील तुरुंगाची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि बॅगेज एक्सरे मशिनच्या खरेदीसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरे आणि एक्सरे सिस्टीम खरेदी करण्यासाठी ३ कोटी ७४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एक महिला, विशेष, किशोर सुधारालय, १९ खुली कारागृहे आणि एक खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे राज्यात आहेत. त्यापैकी येरवडा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, मुंबई मध्यवर्ती, ठाणे आधारवाडी इत्यादी कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदिवानांना ठेवण्यात आले आहे, त्यात सर्वाधिक बंदिवान हे न्यायबंदी आहेत. बंदिवानांच्या वाढत्या संह्ययेबरोबर तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे. तुरुंगाच्या आत आक्षेपार्ह वस्तू आणि पदार्थ पाठवले जात असल्याचाअनेकवेळा आरोप करण्यात आला आहे.
तुरुंगात बाहेरून येणारे बंदिवान, न्यायबंदी चोरून लपून छपून वस्तू तुरुंगात घेऊन जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. या सर्वांवर चाप बसविण्यासाठी तसेच तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरणासाठी ड्रोन कॅमेरे आणि एक्सरे बॅगेज स्कॅनर सिस्टीमची गरज असल्याचे कारागृह प्रशासनाकडून गृहविभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात आले होते. राज्य शासनाच्या गृहविभागाकडून ड्रोन कॅमेरे आणि एक्सरे स्कॅनर खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. गृहविभागाकडून ड्रोन कॅमेºयांसाठी १ कोटी ८० लाख तर बॅगेज स्कॅनरसाठी १ कोटी ९४ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ७४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कारागृह विभागाकडून एकूण १२ ड्रोन कॅमेरे आणि ४ बॅगेज स्कॅनर खरेदी केली जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *