भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नाही : शरद पवार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार आणि समर्थक आमदारांनी मंगळवारी पुन्हा शरद पवार यांची अचानक भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणा आणि आमच्या पाठीशी अजित पवार आणि समर्थक आमदार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपासोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही. लोक भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी अजित पवार गटाकडे मांडल्याची माहिती आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अतुल बेनके, अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्तामामा भरणे, संजय शिंदे, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, सरोज अहिरे, राजु कारेमोरे या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.अजित पवार गटाकडून शरद पवारांना साकडे घालणे सुरू आहे. त्यामुळे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले. अजित पवारांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते शंभर रुपयांच्या बॉण्डवर लिहून देत आहेत.

मनात काय आहे, माहिती नाही : प्रफुल पटेल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी सवाद साधला. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. पक्ष एकत्र ठेवण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात काय सुरू आहे, हे माहीत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *