लाखांदूर तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी १ कोटीं ८० लक्ष रुपयांचा निधी मंजूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : या विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामे खेचून आणण्यासाठी सातत्याने नानाभाऊ पटोले प्रयत्नशील असून विकासाच्या क्रमामध्ये साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२ -२३ बारा तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी ८० लक्ष रुपयाचा निधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेला आहे. शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या विकास कामांसाठी या क्षेत्राचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली आहे.

या विकास कामांमध्ये लाखांदूर तालुक्यातील विरली/खुर्द, किरमटी, बेलाटी, सोनेगाव ,मांडळ बारवा,तावशी, चिचाड ,पिंपळगाव/ को कन्नडगाव ,करांडला, या गावांच्या नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आधी असलेले तलाठी कार्यालय हे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे कार्यालयातील दस्तावेज व त्या भागातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांनी नवीन तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी आमदार पटोले यांच्याकडे मागणी केलेली होती. कली तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारती करिता सातत्याने पाठपुरावा करून आमदार पटोले यांनी एक कोटी ८० लाख रुपयांचा निधी तलाठी कार्यालयांच्या नवीन इमारती करिता प्रशासकीय मंजुरी सह मिळवून दिलेला आहे. लवकरच तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू होणार असून सदर विकास कामे मंजूर केल्याबद्दल क्षेत्रातील ग्रामस्थांसह राजस्व विभागातील कर्मचाºयांनी आ.पटोले यांचे आभार व्यक्त केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *