विराआंस ची गांधी पुतळ्या समोर जंगी जाहीर सभा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पवनी तालुक्याच्या वतीने सोमवार दि. दि.१५ मे २०२३ ला गांधी चौक येथे संध्याकाळी ६ वाजता नवनियुक्त तालुका अध्यक्ष प्रकाश पचारे यांच्या आयोजनात व विलास राऊत माजी जिल्हा परिषद सभापती भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली जंगी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ आंदोलनाचे नेते व विराआस अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप व माजी मंत्री डॉ. रमेश गजबे होते. जाहीर सभेला संबोधित करतांना अ‍ॅड. चटप म्हणाले की, आम्ही कोणत्याही परीस्थितीत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विदर्भ राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती देऊ, त्याकरता पवनी तालुक्यातील जनतेने या आंदोलनात साथ द्यावी, तुमच्या साथी मुळेच विदर्भाचे राज्य मिळणे शक्य आहे.

महाराष्ट्रात १०० वर्ष राहिलो ब्रम्हदेवाला मुख्यमंत्री बनवले गेले तरी विदर्भाचा अनुशेष भरून निघूच शकत नाही, म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. यावेळी विराआस महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमिटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, सभेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती विलास राऊत व चंद्रपूर विभाग युवा आघाडी प्रमुख सुदाम राठोड यांची भाषणे झालीत. सभेला भंडारा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल खोब्रागडे, माजी नगर अध्यक्ष डॉ. पवनी तालुका सोशल मीडिया अध्यक्ष दुर्योधन वैद्य, डॉ.अनिल सतदेवे, डॉ राजेश नंदुरकर, नागोराव शिंदे, माधव हत्तीमारे, पुंडलिक वैरागडे, शरद तवेडे, नवनियुक्त पवनी तालुका युवा आघाडी अध्यक्ष अमित रासेकरसह पवनी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित होते.

सभेच्या शेवट शपथ घेण्यात आली व वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, लेके रहेंगेलेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे, अभि तो यह अंगडाई हैं – आगे और लढाई हैं, कटेंगे मगर हटेंगे नही, लढेंगे – जितेंगे, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ, जय विदर्भ जय जय विदर्भ अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अ‍ॅड.वामनराव चटप यांनी प्रकाश पचारे यांना पवनी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त पत्र देऊन नियुक्त केले. आणि त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेछ्या दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *