वाघाने केल्या दोन शेळ्या फस्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : तालुक्यातीन गुडेगाव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात गुडेगाव येथील तरूणाचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असताना दुसºया दिवशी २४ जून रोजी दुपारी २ वाजता माणिक मेश्राम याने आपल्या शेळ्यांना शेतात चरण्यासाठी नेले असता पट्टेदार वाघाने हल्ला केला.यावेळी शेळ्यांना वाघाच्या तावडीतून सोडवण्याचा माणिक याने प्रयत्न केला असता त्याच्यावर सुद्धा वाघ धावून आला. त्यामुळे थोडक्यात माणिक मेश्राम याने पळ काढला असता वाघाने दोन शेळ्या ठार केल्या.

घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन अधिकाºयांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. वाघाची शहानिशा करण्यासाठी मृत प्राणी त्याच ठिकाणी ठेवण्यात आले असता रात्रीच्या वेळी वाघाने शिकार केलेल्या जागी येऊन एक शेळी फस्त केली. वनविभागातर्फे माणिक मेश्राम यांना प्रत्येकी पाच हजार रुपये तातडीची मदत देण्यात आली. वाघाने ठार केलेल्या दुसºया शेळीला सावरला वनपरिक्षेत्रात पुरण्यात आले. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये दहशत पसरली असून त्यांचे पाळीव प्राणी चारावयास सोडणे बंद केले. वाघाला जेरबंद करण्यासाठी सापळा रचण्यात आला असून वनकर्मचारी नजर ठेवून आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *