वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा बळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी: तालुक्यातील गुडेगाव येथे नरभक्षक वाघाने एकाचा बळी घेतल्यानंतर आज खातखेडा येथे भरदिवसा आणखी एकाचा जीव वाघाने घेतला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या सहाय्यक उपवनसंरक्षकांसह दोन वनपालांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान परिस्थिती निवडण्याच्या हातात पुन्हा वाघाने एका तरुणावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाचे वरिष्ठ अधिका-यांसह वनक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. ड्रोन आणि कर्मचा-यांच्या माध्यमातून वाघाचा शोध घेतला जात असताना घटनास्थळाच्या काही अंतरावर शोध पथकाला वाघाचे दर्शन झाले. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी आलेल्या शूटरकडून योग्य निशाना लावून संधी साधली गेली. वाघ बेशुद्ध झाल्याची खात्री होताच बचाव दलाच्या सदस्यांनी वाघाला पिंज-यात टाकून जेरबंद केले. वाघ जेरबंद झाल्याचे कळताच गावकºयांनी सुटकेचा निश्वास सोडला. वनविभाग आणि पोलिसांच्या पथक परिश्रमातून दिवसभरात वाघाला जेरबंद करणे शक्य झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पसरलेली भिती कमी होणार आहे. सकाळपासून स्वत: भंडाराचे उपवनसंरक्षक गवई घटनास्थळी ठाण मांडून होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.