कार्यक्रमातून जोपासली सामाजिक बांधिलकी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वाढदिवस म्हंटले की अवाढव्य खर्च केल्या जातो, परंतु हा खर्च वाया जावू नये. म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासन्या या करीता आपला वाढदिवस लोकांसोबत आणि त्यांच्या हिताचे कार्यक्रम आयोजित करून साजरा करायचा निर्णय घेण्याचे विचार आ. नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. आ. भोंडेकर यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर द्वारे विविध क्रीडा स्पर्धाव शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धनच्या बक्षीस वितरण समारंभाला ते संबोधित करीत होते. येथील विवाह सेलेबरेशन मधे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात भंडारा जिल्हा रुग्णालया करीता देण्यात आलेल्या चार रुग्ण वाहिकांचे लिकार्पण या प्रसंगी करण्यात आले. भंडारा पवनी विधानसभे करीता जिल्हा शिवसेना, आमदार भोंडेकर मित्र परिवार तथा पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर द्वारे विधानसभा क्षेत्र करीत आदर्श नागरीपुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच खेडाळून करीत क्रीडा स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना आ. भोंडेकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. आदर्श नागरी पुरस्कार अंतर्गत आदर्श आजी, आदर्श आजोबा, आदर्श आई, आदर्श बाबा, आदर्श पालक, आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थिनी, आदर्श सरपंच, आदर्श शाळा, आदर्श महिला बचत गट, आदर्श शेतकरी आणि आदर्श अंगणवाडी यांना प्रथम ११००० रुपये, द्वितीय ७००० रुपये आणि स्मृति चिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, शिव सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गायधने, उपजिल्हा अध्यक्ष सुरेश धुर्वे, शहर अध्यक्ष मनोज साकुरे, शहर संघटक नितीन धकाते यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे शिंदे गटाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *