स्वप्नील मेश्राम नेट सेट परीक्षा उत्तीर्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : युजीसी नेट डिसेंबर २०२२ तसेच महाराष्ट्र सेट २०२३ जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयामध्ये स्वप्नील मेश्राम या युवकाने सहायक प्राध्यापक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करणारा युवक दैनिक भंडारा पत्रिकेसाठी पत्रकारीता करणारा स्वप्नील अमरनाथ मेश्राम याने यावर्षी झालेल्या युजीसी नेट डिसेंबर २०२२ तसेच महाराष्ट्र सेट २०२३ जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयामध्ये सहायक प्राध्यापक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. स्वप्नील हा पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून नागपूर विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयात २०१९ मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दैनिक भंडारा पत्रिकेत त्याने दोन वर्ष अनुभवासाठी पत्रकारीता केली. स्वत:च्या मेहनतीने त्याने सदर नेट,सेट परीक्षा उर्तीण केली. याकरिता दैनिक भंडारा पत्रिकाचे संपादक राकेश चेटुले, उल्हास तिरपुडे, विलास सुदामे, गोवर्धन निनावे, राजू सार्वे, राहूल बांडेबुचे, राकेश गायधने, यशवंत थोटे यांनी स्वप्नीलला मोलाचे सहकार्य केले. त्याच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले असून त्याच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या दिल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *