शेतशिवारात ‘पळस’फुलताच लागते होळीची चाहूल!

गोवर्धन निनावे भंडारा : फांद्यावर न थांबणारी पाने,सुकडत जाणाºया सावल्या, गळलेल्या पानांचा पसरलेला सडा आयुष्याचे केसरी रंग मुक्त हस्ताने उधळणारा पळस या वेगळ्या रंगसंगतीत ऋतूराज वसंताच्या आगमनाने सृष्टीला पुन्हा जगण्याचे बळ मिळणार आहे. सोबतच त्यांचे लावण्यही खुलणार आहे. झाडांची पाने गळण्यास लागली की समजावे ही वसंताची चाहूल आहे. झाडांच्या पानांची गळती सुरू आहे. पानगळ झालेली झाडे,रणरणतं ऊन जगण्याची उमेद संपलेला ऋतू या सर्व निसर्गाच्या बदलासोबतच रानावनात पायवाटेवरून जगण्याचा संदेश घेऊन येणारा पळस आयुष्याची केसरी रंग मुक्तफळाने उधळत साºया सृष्टीला जगण्याचे बळ देत आहे. फुलझाडांच्या गर्दीत तसा हा उपेक्षीत वृक्ष सध्या प्रत्येकाच्या मनाला मोहून घेतोय.

जीवन काटेरी असले तरी जगण्यात मौज आहे. फुलझाडांच्या गर्दी तसा हा उपेक्षीत वृक्ष सध्या प्रत्येकाच्या मनाला मोहून घेतोय. जीवन काटेरी असले तरी जगण्यात मौज आहे. हे पळसाला सिद्ध करायचे आहे. पळसाला आपलं म्हणून कुणीही जपत नाही. तरी पळसाच्या मनाचा मोठेपणा जातो. या ऋतूत आंब्याला येणारा बहर मन समृद्ध करून जातो. सर्वत्र रणरणत ऊन जरी असेल तरीपण निसर्गसष्टी. बहरलेली दिसते. पानगळीमुळे इतर वृक्षांना नव्या साजाची प्रतिक्षा असतानाच पळस आणि आम्रवृक्ष त्यांच्या बहरलेल्या जणूकाय इतर वृक्षांना बिडवत असल्याच्या भास होतो. मात्र,असे नव्हे तर ते म्हणतात की तुम्हालासुद्धा नवबहार येईल. तुम्हीही सृष्टीला सजवणार! निसगार्चा नियमच आहे. ऋतूमानातील बदलानुसार सृष्टी आपले सौंदर्य सजवित असले. जसे आपले सौंदर्य सजवित असते असे मनमोहक दृश्य मनाला नवचैतन्य देते. तसेच वसंतातील पळस व आंब्याचे बहरणे मनाला नवचैतन्य देते. तसेच वसंतातील पळस व आंब्याचे बहरणे मनाला मोहून टाकते. आपण सर्वजण निष्पर्ण झालो तर सृष्टीचे सौंदर्य खुलणार नाही. म्हणूनच निसर्गाने आम्हाला पळस,आंबा फुलवत ठेवत असेल नाही का? वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच होळीच्या पर्वावर पळस फुलांना रानाचे आकर्षन मनमोहून घेत आहेत. रानावनातील वृक्षांची पानगळ सुरू झाली आहे तर काही वृक्षांनानवीन पालवी धारण केली आहे. तिच्या चक्रासोबत हे सारे काही घडत असते.

जरासुद्धा लपत नाही. सर्व सृष्टी जुन्या पालवीच्या प्रतिक्षेत असतानाच पळस व मात्र फुलांद्वारे केशरी कुंकू बननू तिच्या सौंदर्यात भर घालतेय, पळसाचे हे रुप पाहून ऋतूराजही अस्वस्थ झाला असेल. मात्र पळसाला ही देण निसर्गानेच दिली आहे. वसंत म्हटला की, कोकीळेचे स्वर पंचम पान झडलेल्या शुष्क फांद्यांच्या वाट्यावर डोलणारा मंद स्वर ही नादसृष्टी वसंताचे वैशिष्ट्यपूर्ण संगीत होय. पुन्हा नव्या आकांक्षाचे त्यांना डोहाळे लागले आहे. वसंत ऋतूतील कोकीळीचे कुहूकने मनाला साद घालून निसर्गाच्या नियमाप्रमाणे आता हिवाळ्याच्या सरतेशेवटी गावाशेजारी तलावाच्या पाळीवर शेतशिवारात या वसंत ऋतूच्या पर्वावर आम्रवृक्षाला मोहोर आल्याने आम्रवृक्ष तरूणांसारखा खुलून दिसत आहे. त्याचबरोबरच होळीचा सण आला की,पळस वृक्षही फुलांनी बहरून आलेला दिसत आहे. त्याचप्रमाणे आता आंब्याला मोहर बहरलेला आहे. आंबा म्हटले की, फळांचा राजा उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याची आंबटचव सर्वांनाच आवडीची असते तर पिकला आंबा याची गोड चव अनेकांच्या आवडीची झालीआहे.

आता नुकताच आंब्याला मोहोर आला असून बहरलेल्या आंब्याच्या झाडांमुळे वसंत ऋतची चाहूल लागली दिसत असून मंद वाºयात आम्रवृक्षाच्या मोहोराचा बहराचा सुगंध मोहून टाकत आहे. ऋतूत बदल झाला की,निसर्गचक्रही बदलत असते. या ऋतूचक्रात अनेक वृक्षवेली व वृक्षसुद्धा आपले सौंदर्य बदलवित असतात. काही वृक्षांना अशावेळी नवी पालवी येत असते तर काही वृक्षांची पानगळ सुरू असते. वसंत ऋतूची आगमन महाशिवरात्रीच्या पर्वावर सुरू होत असते. काही दिवसात होळीचा पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे होळीच्या सणाची ओढ सर्वांना लागली आहे. अशा हंगामात जंगलव्याप्त भागात पहाटे थंड वाºयाचा झुळूक आली. आम्रबहराचा मधूर सुगंध दरवळू लागला आहे. वातावरणातील तापमान वाढत चालले आहे. दिवसा उष्णतेचे वातावरण तर रात्री थंडीचा गारवा यामुळे वातावरण बदलतआहे. शेतशिवारात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी, वटाणा, जवस, मोहरी याचे पीक खुलून दिसायला लागले आहे. पूर्वीच्या काळात महाशिवरात्री आली की, शिवभक्त मोहरीचे फुल मोठ्या भक्तीभावाने शिवशंकराच्या पिंडावर वाहत होते. त्याचप्रमाणे हा हंगाम म्हणजे हिवाळ्याच्या समाप्तीचा ऋतू तर उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल असते. त्यामुळेच अशावेळी आम्रवृक्षाला बहर आलेला दिसत आहे. त्यामुळे वसंत ऋतूची चाहूल लागल्याचे चित्र दिसायला लागले आहे.                         होळीचा सण काही दिवसावर येऊन ठेपला असताना पळसालाही फुले लागली आहेत. त्यामुळे वनात पळसाचे झाड खुलून दिसत आहे. μलेम आॅफ द फायर, असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे आदराने वर्णन केले आहे तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे. लाल, केशरी आणि क्वचित पांढºया रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगरदºया आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत. शिशिराची थंडी ओसरायला लागली. पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर कालिमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी मुद्दाम भक्तिभावाने वापरले जातात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच,अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *