जर्मनीच्या बर्लिन मध्ये बाप्पाचे जोरदार स्वागत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘मराठी मित्र बर्लिन’ आयोजित तथा रमणबाग युवा मंच, जर्मनी आणि श्री गणेश हिंदू मंदिर, बर्लिन यांच्या सहकायार्ने युरोप मधील पहिल्या १० दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या द्वितीय वर्षाची सुरुवात आज ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपरिक पूजेने झाली. मागील वर्ष प्रमाणे ह्या वर्षीही गणेशमूर्ती ही पुण्याचा मानाचा प्रथम गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे येथून आली आहे. बाप्पाचे स्वागत भारतीय राजदूत पी हरीश यांनी सहपरिवार आरती करून केले. ह्या कार्यक्रमाला अंदाजे ४०० भाविक उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले कर्मचारी, उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आणि भारतीय उद्योजक सगळे मिळून ‘लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकडून’ ह्या कल्पनेने हा उत्सव संपन्न करीत आहोत. समस्त भारतीय बर्लिनवासी १० दिवस साजरा होणाºया ह्या उत्सवासाठी सज्ज आहेत. या गणेशोत्सवाच्या तयारी करिता येथील मंडळीनी अथक परिश्रम घेतले आहेत. या १० दिवसाच्या उत्सवात अनेक विख्यात कलाकारांद्वारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रम करिता भारतामधून खास कलाकार येणार आहेत.

यामध्ये कल्याण पांडे आणि मृगेंद्र महोडकर- तबला आणि बासरी जुगलबंदी, अनंत आणि धानी गुडेचा – धृपद गायन, कल्याणी देशपांडे आणि मोहित कार्ले तबला आणि गायन, – तेजस्विनी साठे आणि विद्यार्थी – कथ्थक नृत्य, ह्या कलाकारां व्यतिरिक्त बर्लिनमधील स्थानिक कलाकार आणि लहान मुले आपल्या कलेद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतील. परदेशी राहून आपल्या संस्कृतीचे केलेले जतन पाहून नक्कीच आनंदाने ऊर भरून येईल.

यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गणेशमूर्ती कायार्शाळा, फेटा बांधणी कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, सहस्त्र अथर्वशीर्ष पठण (२४ सप्टें., सकाळी) आदींचे आयोजन करण्यात आले आहे. माननीय हर्डीकर गुरुजी खास ह्या निमित्ताने भारतामधून बर्वे गुरुजींच्या मदतीसाठी आले आहेत. पुढील १० दिवसांच्या काळात ५-७ हजार भाविक बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येतील असा अंदाज आहे. हजारो भाविकांव्यतिरिक्त, बर्लिनमधील भारतीय राजदूत, स्थानीय नेते आणि इतर मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे. ३० सप्टेंबर रोजी, मागील वर्षाप्रमाणे भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जर्मनीतील रमण बाग ढोल ताशा पथक आणि मराठी मित्र बर्लिनचे लेझीम पथक गेले ३ महिने त्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. बर्लिनमधील बाप्पांच्या या उत्सवाला स्थानिक लोकांसहीत, स्थानिक भारतीय व्यापारीगण आणि इतर सामाजिक संस्थांची भरघोस मदत होत आहे. बर्लिनमधील बाप्पांच्या या उत्सवाला स्थानिक लोकांसहीत, स्थानिक भारतीय व्यापारीगण आणि इतर सामाजिक संस्थांची भरघोस मदत होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *