भंडारा- बालाघाट राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरणास दिरंगाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा तुमसर बालाघाट आंतरराज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण मागील दोन वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे सध्या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून भंडारा ते तुमसर, बपेरापर्यंत रस्त्यावर पडलेले जीव घेणे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागानेच तात्काळ भरण्याची गरज आहे. या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक (तांत्रिक) व प्रकल्प संचालक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना कळविले आहे.

दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला होता हे विशेष. भंडारा- तुमसर- बपेरा- बालाघाट हा आंतरराज्य महामार्ग असून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी घोषित केला होता. परंतु सदर रस्त्याचे अजून पर्यंत कामाला सुरुवात झाली नाही यारस्त्यावर जीव घेणे खड्डे ठीक ठिकाणी पडले आहेत त्यामुळे हा रस्ता मृत्यू मार्ग ठरत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *