योगेशची आत्महत्या नसून हत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक योगेश सिताराम लोखंडे यांची आत्महत्या नसुन हत्या आहे. याची गुप्तचर पोलीस विभागातर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी मृतकाचे वडील सिताराम लोखंडे व त्यांच्या कुटुंबियांनी पत्र परिषदेतुन केली आहे. दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी योगेश त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु त्याचा थांगपत्ता लागला नाही त्यामुळे कुटुंबीयांनी २८ फेब्रुवारी २०२३ ला पवनी पोलीस स्टेशन येथे योगेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली . दरम्यान ७ एप्रिल २०२३ रोजी तब्बल ४० दिवसांनी सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह पवनी शहरापासून तीन ते चार किलोमीटर लोखंडे त्यांची मोटरसायकल पॅशन प्लस ने घरून बाहेर पडला मात्र रात्रीला घरी आलाच नाही त्याचा मोबाईलसुध्दा बंद दाखवित होता.

कुटुंबीयांनी दोन दिवस अंतरावर असलेल्या इटगाव शिवारात आढळून आला. त्यावेळी घटनास्थळी त्याची मोटर सायकल आढळली नाही. सदर मोटर सायकल २१ दिवसानेघटनास्थळापासून अवघ्या सातशे मीटरवर मृतदेहाच्या विरुद्ध बाजूला आढळून आली. शेतशिवारात मिळालेली मोटर सायकल तिथे कशी आली? असा संशय पत्र परिषदेमध्ये सिताराम लोखंडे व कुटुंबियांनी केला. योगेश लोखंडे यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत असताना देखीलत्यांच्या पत्नीने यासंदर्भात योग्य ते पाऊल उचलले नाही असा संशय लोखंडे यांच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केला. योगेश लोखंडे व त्याची पत्नी यांच्यात नेहमी खटके उडायचे व यातूनच त्यांचा खून करण्यात आला असावा असाही आरोप पत्र परिषदेत करण्यात आला.

योगेश लोखंडे यांची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली असुन याची सखोल चौकशी गुप्तचर विभागातर्फे करण्यात यावी व योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी योगेश लोखंडे यांच्या कुटुंबांनी केली असून आपल्याला योग्य न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रपरिषदेत दिला . पत्र परिषदेला मृतक योगेश लोखंडे यांचे वडील सिताराम विठोबा लोखंडे , भाऊ जगदीश सिताराम लोखंडे,अरविंद सिताराम लोखंडे आदि उपस्थित होते.

मृतक योगेश लोखंडे यांच्या खुनाच्या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने तपास सुरू असून सखोल चौकशी सुरू आहे या संदर्भामध्ये पोलीस विभाग प्रयत्नशील असून लवकरात लवकर याचा शोध घेण्यात येईल.
नरेंद्र निस्वादे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पवनी.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *