माधवराव लेदे यांचे मरणोत्परांत नेत्रदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर माधवराव लेदे (८६ वर्ष) यांचे मंगळवारी दि. ०१/११/२२ ला वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पुत्र संजय लेदे वैनगंगा विद्यालय पवनी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी वडिलांची ईच्छा पुर्ण करुन वडिलांच्या मरणोत्परांत नेत्रदान करून अंधत्व निवारणाच्या राष्ट्रीय कार्यात योगदान दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्रापेढीचे डॉ. अमित ढोमणे व डॉ. प्रभाकर लेपसे, नेत्रदान समुपदेशक सोनाली लांबट यांनी त्यांच्या नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडून नेत्रसंकलन केले. याप्रसंगी तुषार नखाते, संजय लेदे, मनोज माळवी, पराग टेंबेकर, किशोर भांडारकर, राजेश एलसेटीवार, अजय भुरे, कमलाकर मेश्राम, अतुल कोंडेकर, विजू जिभकाटे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *