मंगळसूत्र चोरणाºया आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : एक वर्षापुर्वी बसस्थानक पवनी येथून एका महिलेचे मंगळसूत्र चोरणाºया दोन परप्रांतीय व्यक्तींना पकडण्यात पवनी पोलिसांना यश आले असून अटकेची कारवाई करण्यात आली. यातील आरोपीतांची नावे फुरकाण सुक्के अन्सारी वय ४७ वर्ष राहणार कोतवाली देहात तालुका नगीना जिल्हा बिजनोर व सरफराज शेर मोहम्मद वय ४४ वर्ष राहणार काराबार तालुका ठाकूरद्वार जिल्हा मुरादाबाद असून दोन्ही उत्तर प्रदेशातील आहेत. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २३/३/२०२२ ला भंडारा येथील एका महिलेचे मंगळसूत्र पवनीच्या बस स्थानकावरून चोरट्याने पळविल्याची घटना घडली होती.

चोरट्यांचा शोध सुरू असताना रविवारला पेट्रोलिंग दरम्यान बस स्थानक परिसरात संशयितरित्या दोन व्यक्ती आढळून आल्याने पोलीस स्टेशनला नेऊन विचारपूस करण्यात आली. यात सदर चोरट्यानी गुन्ह्याची कबुली देऊन मंगळसूत्र नागपूर येथील रिश्तेदाराकडे ठेवल्याचे सांगितल्याने एकूण १२०००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अनंता गारमोडे यांनी केली असून आरोपितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *