पेटी वाटपाचा नादच खुळा,कामगार झाला येळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : शासनाकडून मिळणाºया पेटीचा नाद खुळा झाल्याने कामगार राजा येळा झाल्याचा प्रकार पवनी तालुक्यात ठीक-ि ठकाणी पाहायला मिळत असून शनिवारी तर पेटी वाटप करणाºया एजंटांनी चक्क पवनी येथील बेलघाटयातील वाटप बामणी रस्त्यावरील पेट्रोल पंपावरच पळविला.प्राप्त माहितीनुसार ९० दिवस मजूर म्हणून खाजगी तथा कंत्राटदाराकडे काम करणाºया व्यक्तींची नोंद केल्या जाते. ही नोंद करतांना ग्रामीण मजुरांना ग्रामसेवकाचा तर शहरी मजुरांना मुख्याधिकारीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. कामगार कल्याण महामंडळाकडे मजूर म्हणून नोंद झालेल्यांना शासनाकडून मिळणाºया सोयीसुविधांचा फायदा मिळण्यासाठी एजंट नेमून दिल्यामुळे प्रचंड घोळ होत असून मिळणाºया साध्या पेटी साठी लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागतात.

यात एजंटाचे मात्र चांगभले होत असल्याचे उदाहरण पेट्रोलपंपावर पेटी वाटप दरम्यान घडलेल्या प्रकाराने उजेडात आले. पवनी तालुक्यासाठी बामणी येथील एजंटाची नेमणूक असून त्याने संधीचा फायदा घेतगरीब मजुरांना पेटी देण्याच्या नावावर लुटमार चालविली असल्याचे सांगण्यात येत आहे. मजुरांच्या पाल्यांना मिळणारी स्कॉलरशिपची देखील संस्था चालकाशी सलगी करून “अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही” याप्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *