भाडेपट्टीवर शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र चालविण्याच्या निविदा रद्द करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भाडेपट्टीवर चालवण्यासाठी काढण्यात आलेले निविदा रद्द करण्यात यावा यासाठी भंडारा जिल्हा मच्छीमार संघाचे तर्फे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई, विजयकुमार गावित पालकमंत्री भंडारा जिल्हा यांना जिल्हाधिरी कार्यालय भंडारा मार्फत निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्हा हा तलावांच्या जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे त्या तलावावर मासेमारी संस्थेच्या मार्फत मासेमारी करतो आणि आपला उदरनिर्वाह चालवतो.

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील २५० च्या वर मासेमारी संस्था असून या सर्व मासेमारी संस्था जून महिन्यात दोन्ही जिल्ह्यांतील मिळून एकमेव असलेल्या शिवनीबांध येथील शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्रातून मत्स्यबीज वाजवी दरात उपलब्ध होते. खाजगीकरणामुळे मत्स्यबीज मासेमारी संस्थांना कमी दरात मत्स्यबिज उपलब्ध होणार नाहीत व १० टक्के मत्स्यबीज पुरवठा संस्थांना होणार नसल्यामुळे मासेमारी संस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या शासनाच्या मत्स्य बीज केंद्राचे लिलाव रद्द करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन भंडारा जिल्हा मच्छीमार संघातर्फे भंडाराचे जिल्हाधिकाºयांमार्फत मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंट्टीवार तसेच पालकमंत्री गावित यांना पाठविण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष देविदास नगरे, संचालक गजानन बादशहा, टी.डी मारबते, व्यवस्थापक सुनील शिवरकर, संस्थेचे सभासद संजय चाचरे, हंसराज चाचरे, राजकुमार खेडकर, संजीव मेश्राम, कांबळे, अ‍ॅड. दिपक मारबते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *