आपली संस्कृती जपा – आ. कारेमोरे

भंडारा पत्रिका/वातार्हर गर्रा बघेडा : श्री कृष्ण गोशाळा तुमसर येथे रविवार दिनांक १० मार्च रोजी आयोजित गौमाता छप्पन भोग कार्यक्रमाची सांगता साणंद येथे झाली. प्रमुख पाहुणे आमदार राजू कारेमोरे होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संपूर्ण जग भारतीय संस्कृतीचे पालन करत असून आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. आपण आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. व जनता व लोकप्रतिनिधींनी आपले मानसिक विकार दूर करून माता गाईची सेवा करुन आपली संस्कृती जपली पाहिजे. प्रमुख पाहुणे आ. राजू कारेमोरेसह माजी खासदार मधुकर कुकडे, सुंदरलाल अग्रवाल, महेश छजुलालजी शर्मा, ईश्वरदास खंडेलवाल, मुरलीधर सराफ, ग्यार्सीलाल अग्रवाल, डोंगरसीदास सराफ, भंडारा जि. पोलीस अधीक्षक लोहित मतानी, राजाराम शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ ईश्वरदास खंडेलवाल यांचा श्री कृष्ण गोशाळा समितीतर्फे आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सौ.मोहिनीदेवी सराफ यांचा सौ.शकुंतला देवी नागपोटा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. छप्पन भोगले आपल्या संस्कृतीत छप्पन भोगाला खूप महत्त्व आहे कारण भगवान श्रीकृष्णाशी छप्पन भोगाचा थेट संबंध आहे.

भगवान श्रीकृष्णाला ५६ नैवेद्य अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. प्रसन्न होऊन सर्व संपत्ती, सुख, संपत्ती भगवंताकडून प्राप्त होते, हे भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे भगवान श्रीकृष्णाला माता गाय ही सर्वात प्रिय आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. संयोजक समिती प्रमुख दिनेश अग्रवाल, श्याम अग्रवाल यांच्यासह श्री कृष्ण गोशाळा परिवार तुमसरचे ब्रिजमोहन नागपोटा, पुनम अग्रवाल, विकास निखाडे, राकेश असती, विशाल आ. जैस्वाल, सीताराम जोशी, बेनिश्याम खंडेलवाल, मनोज उकरे, अनिल सराफ, अजय अग्रवाल, नवनीत जोशी, हर्षल गायधने, संजय अग्रवाल, बनवारी मोर, सुशील शर्मा, गोविंद अग्रवाल, कैलाश शर्मा, सुमित अग्रवाल, शुभम निखाडे, उमेश शर्मा, सुमीत अग्रवाल. अशोक कुमार. शर्मा, राजेंद्र मालेवार, डॉ. बाबाराव सरदार, मनोज असाती, अंकित लांजेवार, निकेश पशिने, डॉ. सहस्राम गायधने, लक्ष्मीनारायण डहरवाल, नमिता दुबे/व्यास, हेमा अग्रवाल, ज्योती अग्रवाल, नीरू निखाडे,दीपा अग्रवाल, उषा बावनकर, योगिता बावनकर, सरिता कुलवाल, वीणा खंडेलवाल, सफाल शर्मा एक्स्प्रेस कंपनी श्रद्धा, गाईला छप्पन भोग खाऊ घालण्याच्या या सामाजिक कार्यक्रमात तुमसर शहर व आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या हितचिंतकांसह उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *