बेपत्ता इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : मागील दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या पवनी येथील इसमाचे प्रेत शुक्रवार दिनांक ७ एप्रिलला इटगावच्याशेतशिवारात सडलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. यातील बेपत्ता मृतक इसमाचे नाव योगेश सीताराम लोखंडे वय ४० वर्षे राहणार गौतमनगर वॉर्ड पवनी असे आहे. इटगाव येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्रेत मिळाल्याची माहिती परिसरात पसरल्याने बघ्यांची देखील गर्दी उसळली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत प्रेताची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला मार्गी लावले.
दरम्यान प्रेताचा पंचनामा करतांना मृतकाच्या खिशामध्ये असलेल्या पॉकेटमध्ये आधार कार्ड मिळाल्यानेप्रेताची ओळख पटली. मिळालेले प्रेत कुजलेल्या अवस्थेत असून निळा जीन्स पॅन्ट व गळ्यात पांढरा कापड होते. सदर प्रेत इटगाव रस्त्यावरील प्रकाश रेहपाडे यांच्या शेतालगत असलेल्या पाटामध्ये आढळले. पोलिसांनी प्रेताला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे हलविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुनील राऊत, पीएसआय मनीष मानकर, पोलीस हवालदार सत्यराव हेमने करीत आहेत.
ही आत्महत्या की हत्या?
योगेश लोखंडे ठेकेदारीचा व्यवसाय करायचा. महिनाभरापूर्वी घरून निघून गेला असतांना कारण कळू शकले नाही. नातेवाईकांनी शोध घेतला असता मिळाला नसल्याने उलटसुलट चचेर्ला उधाण आले होते. अनेक दिवसानंतर आज सकाळी १० वाजता पोलीस पाटील इटगावच्या पोलीस पाटलाकडून पोलीस स्टेशनला फोन आला. प्रकरणाची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रेतावरील असलेल्या खुणांमुळे ही आत्महत्या की हत्या? असा एकच प्रश्न जनतेमध्ये दबक्या आवाजात उपस्थित केल्या गेला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *