पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प रखडल्याने अखेर शेतकºयांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पूर्व विदर्भातील महत्त्वा कांक्षी प्रकल्प म्हणून भेल कारखान्याचे भूमिपूजन दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. दहा वर्ष लोटूनही भेल कारखाना सुरू न झाल्यामुळे परिसरातील बेरोजगारांचा व शेतकºयांच्या भ्रमनिराश झाला आहे. अनेक आंदोलन करून शासनाला निवेदने देऊन भेल कारखाना सुरू करावा अशी मागणी मागील दहा वर्षात अनेकदा करण्यात आली. मात्र भेल कारखाना सुरू होण्याची चिन्ह दिसत नाही. प्रशासनाच्या व सत्ताधाºयांच्या दुर्लक्षित धोरणाला कंटाळून परिसरातील मुंडीपार, बाम्हणी, खैरी येथील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने भेल प्रकल्प सुरू करण्यात यावे अन्यथा आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचा निवेदन तहसीलदार साकोली यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे. साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथे ५०० एकर जागा अधिग्रहण करून भेल कारखान्याचे २०१३ वर्षी भूमिपूजन करण्यात आले होते. परिसरातील शेतकºयांच्या बेरोजगार मुलांना रोजगार मिळेल या आशेवर शेतकºयांनी कवळीमोल दरात शासनाला जमीन अधिग्रहित करण्यासाठी दिल्या होत्या. शासनाच्या खोट्या आश्वासनावर या प्रक्रियेत अनेक शेतकरी भूमीहीन झाले. शेतकºयांच्या मुलांना तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची हमी या माध्यमातून करण्यात आली होती.

मात्र दहा वर्ष लोटूनही भेल प्रकल्प शासनाच्या व राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे सुरू झालेला नाही. परिसरातील शेतकºयांनी अनेकदा आंदोलन करून शासनाला निवेदन सादर केले व भेल कारखाना सुरू करण्यासाठी वेळोवेळी मागणी केली. प्रत्येक वेळेसआंदोलनकर्त्यांचा भ्रमनिराश करून शासनाने दखल घेतली नाही. शासनाच्या व राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित धोरणाला कंटाळून अखेर परिसरातील शेतकºयांनी व बेरोजगारांनी येणाºया निवडणुकीत मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेऊन त्या आशयाचा निवेदन तहसीलदार साकोली यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांना दिला आहे. निवेदन देणाºया प्रतिनिधी मंडळात भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना चे अध्यक्ष विजय नवखरे, उपाध्यक्ष मुकेश मेनपाले मनोरमा हुमने सरपंच मुंडीपार, हरीश लांडगे उपसरपंच मुंडीपार, नुतन झिंगरे सरपंच खैरी, हरिभाऊ वरकडे उपसरपंच बाम्हनी, रामेश्वरभाऊ निम्बातें, हरिभाऊ वरकडे, ज्ञानेश्वर पडीकेव प्रकल्प ग्रस्त शेतकºयांचा समावेश होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *