गोंदिया जिल्ह्यात १२ तास विद्युत पुरवठा द्या

भंडारा प्रतिनिधी/प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून गोंदिया जिल्हाची ओळख आहे. जिल्ह्यातील कृषि पंपांना आता दिवसा १२ तास विज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावे. ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपाना १२ तास विद्युत पुरवठ्याचे आदेश २९ नोव्हेंबर २०२३ दिले. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्याने शेतकºयांना रात्री शेतातील पिकांचे ओलीत करतांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. वन्यप्राणी व जंगली श्वापदांच्या हल्ल्यात अनेक शेतकºयांना जिव गमावावे लागले त्याच प्रमाणे गोंदिया जिल्हात पन १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा. गोंदिया जिल्हा हा गडचिरोली जिल्हाची सिमा लागुन आहे. दोन हि जिल्हे हे आदिवासी नक्षलग्रस्त जंगल व्याप्त आहे याचा विचार करून ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्हाला १२ तास विद्युत पुरवठ्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे गोंदिया जिल्हाला सुद्धा आदेश देण्यात यावे.

गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी हंगामात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याचा विचार करता गोंदिया जिल्हाला सुद्धा १२ तास दिवसाने विद्युत पुरवठ्याचे आदेश देण्यात यावे हि विनंती. वांरवार पाठ पुरावा करून देखील या मांगणी कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. १२ तास विद्युत पुरवठ्यासाठी घरगुती लाईनमध्ये भर नियम लागू करण्यात आले आहे. परंतु शेतकºयांना कृषी पंपासाठी १२ तास विद्युत पुरवठ्याचे आदेश देण्यात यावे या आशयाचे निवेदन सडक अर्जुनीचे महावितरणचे उपअभियंता नायडू यांना देण्यात आले. याप्रसंगी दिनेश कोरे, मिथुन मेश्राम सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.