राजमुद्रा तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : जागतिक महिला दिनाचे अवचीत्य साधून १० मार्च रोजी तुमसर शहरात राजमुद्रा ग्रूप तर्फे विविध क्षेत्रात काम करणा?्या महिलांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना मान देण्यात आला. संताजी सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध सेवा भावी महिला संघटना प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यात या तुमसर येथील सखीमंच, ग्लोरी झुंबा फिटनेस क्लब, वुमेन्स राईट फेडरेशन, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशन, सर्व महिला बचत गट, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, जेसीआय तुमसर, उडान, वुई-क्लब, जिजामाता महिला मंडळ या यांचा समावेश होता.डॉ .सुधा भुरे यांना जीवन गौरव पुरस्कार- महिला रोग तज्ञ म्हणून तुमसर शहरात डॉ. सुधा भुरे ह्या गेल्या ३५ वर्षांपासून काम पाहतात. त्यांचा सल्ला महिलांवरील त्यांचे उपचार सर्वदूर जाणले जाते. त्यांच्या समाजोपयोगी कामांची दाखल राजमुद्रा ग्रुपने घेऊन महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा रंजीता कारेमोरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सत्कार मूर्ती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय चे संचालीका शक्ति दीदी, संताजी स्नेही समाज मंडळाच्या पहिला महिला अध्यक्ष स्नेहा भिलावे यांना राजमुद्रा ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त नगरपरिषद तुमसर येथील महिला सफाई कर्मचारी, सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालय येथील महिला सफाई कर्मचारी, विद्युत विभागात कार्यरत महिला, रक्तदानासाठी पुढाकार घेणा?्या महिला तसेच समाजासाठी उल्लेखनीय काम करणा?्या विविध महिलांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मॅरेथॉनच्या मानकरी- महिला दिना निमित्त राजमुद्रा तर्फे आयोजित मॅरेथॉन मध्ये शहरातील ४५ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात धनवंता आगाशे यांनी प्रथम, अर्चना पंद्रे यांना द्वितीय तर रेखा चमक यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. त्यांना राजमुद्रा तर्फे रोख रक्कमेचे पुरस्कार देखील देण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *