कार -दुचाकीचा अपघातात, एक ठार,दोन गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : कोढा परिसरात झालेल्या चारचाकी-दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार तर दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१६ जुलै २०२३ रोजी दुपारष्च्या सुमारास घडली.जखमींवर भंडारा येथील लक्ष हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. कोंढा ते पवनी राज्य मार्गादरम्यान कोंढा परिसरात चारचाकी क्र.एमएच.४० एसी ७१७० व हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एमएच ३६ बी ८४१९ यांच्यात अपघात होवुन दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाले त्यात सुमित्रा नामदेव बावनकर वय ६० वर्षे रा.कोंढा हि वृध्द महिला ठार झाली तर दिपक मंगल जुमळे वय २७ वर्ष व रोहित यादव वय २८ वर्ष दोघेही रा.कोंढा हे गंभीरजखमी झाले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *