राजेंद्र जैन यांना राज्यपाल नामनिर्देशीत आमदारकी द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा येथील पुज्य सिंधी समाज भवन येथे दिनांक १६ जुलै रोजी तिरोडा शहर राष्टवादि काँग्रेस पार्टी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तिरोडा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तिरोडा यांच्या वतीन आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रफुल्ल भाई पटेल राज्यसभा सदस्य भंडारा गोंदिया यांचे कडे माजी आमदार राजेंद्रजी जैन यांना राज्यपाल निदेर्शीत आमदारकी द्या अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार राजेंद्र जैन हे गेली अनेक वर्षे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात पुर्णपणे समर्पित भावनेने जनतेची गोंदिया, भंडारा जिल्हाच नव्हे तर लगतचे मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यातही सेवा देत असून मागील २५ वर्षा पासून खासदार प्रफुल्ल भाई पटेल यांचे मार्गदर्शनात सामाजिक, शैक्षणिक सहकार क्षेत्रात काम करीत असुन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असुन प्रफुल्लभाई पटेल हे राष्ट्रीय नेते असून त्यांनी राज्याचे हिताकरता भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले असून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विकासा करता माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यपाल निदेर्शीत १२ आमदारांच्या नियुक्तीमध्ये राजेंद्र जैन यांना स्थान देण्याची एकमुखी मागणी प्रफुल्लभाई पटेल यांचेकडे करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

या वेळी डॉ अविनाश जैस्वाल,नरेश कुंभारे, अजयसिंग गौर, माजी उपाध्यक्ष राजेशजी गुनेरिया, माजी नगरसेवक विजय बनसोड, माजी नगरसेवक ओमप्रकाश येरपुडे, सलीम झवेरी, प्रभू असाटी, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, माजी पंचायत समिती सभापती निताताई रहांगडाले, तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, किसान आघाडी सेलचे अध्यक्ष डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी, बालू (जगदीश) बावनथडे, प.स. सदस्य जितेंद्र चौधरी,विजय बिझ- ांडे,सरपंच राजू ठाकरे, भोजराज धामेचा व बबलू ठाकुर प्रशांत डहाटे विजू बुराडे, शहर व ग्रामीणच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाºयांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *