चिराग काटेखायेची विरोधी पक्षनेतापदी निवड

तालुका प्रतिनिधी मोहाडी : यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) महाराष्ट्र राज्य च्या विरोधी पक्षनेते पदी चिराग मधुसूदन काटेखाये यांची निवड करण्यात आली. निवडणूक समितीच्या माध्यमातून चार गटांची निवड करण्यात आली होती. या गटांच्या माध्यमातून गटनेता आणि प्रवक्ता निवडण्यात आला.दोन गटाचे सदस्य आणि अपक्षांच्या मदतीने ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण करत लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेता राज्य संपर्कप्रमुख व अन्य मंत्रिमंडळ सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनुषंगाने काम करताना नेतृत्व विकासाची संधी ‘यिन’ व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यभर विविध महाविद्यालयांत निवडणुका उत्साहात पार पडल्या. सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली होती.

या प्रक्रियेनंतर नवी मुंबई येथील कार्यालयात ‘यिन’चे मुख्य निवडणूक अधिकारी चेतन बंडेवार यांच्या माध्यमातून संपूर्ण मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे यिन अधिवेशनाला सुरुवात झाली हे अधिवेशन आहे. अधिवेशनादरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते चिराग काटेखाये चा सत्कार करण्यात आला. त्यांनतर त्यांनी अनेक मोठे प्रश्न अधिवेशनात मांडले ज्या मध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्हयातील भात उत्पादक शेतकºयासाठी बोनस जाहीर करावे आणि धान खरेदी केंद्र वाढवावी अशी मागणी केली. त्यात चिराग काटेखाये विरोधी पक्षनेते आणि कृषी समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष अश्या महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसत आहे. ह्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *