हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९३ वी जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर/मोहाडी विधानसभा मध्यवर्ती कार्यलय तुमसर येथे हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी तुमसर येथील शिवसेना कार्यालयामधून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. जय भवानी जय शिवाजी घोषणा देत सर्वप्रथम कृषि उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभीषेक करुन माल्यार्पण करण्यात आले. नंतर तुमसर बस स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले. नंतर सुभाषचंद्र बोस उप जिल्हा रुग्णालयातील छत्रपती शिवाजी महा-राजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मिठाई वितरण करण्यात आली. नंतर नगरपरीषद तुमसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेची पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. व ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर पोवाडे व देशभक्ति गितांचा कार्यक्रम सादर करण्यात आले.
या कार्यक्रमात विषेश अतिथी खासदार मधुकर कुकडे, पोलीस निरीक्षक नितीन चिचोंळकर व डॉ.गोविन्द कोडवानी हे उपस्थित होते. तसेच शिवसेना भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी माजी आमदार अनील बावनकर, उपजिल्हा प्रमुख नरेश उचीबगले, उपेश बान्ते पाटिल, रामनारायण केजडीवाल, उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपशहर प्रमुख किशोर यादव, मोहनीश साठवणे, शेखर जागंळे, भुषण बुधे, दिगंबर देशभ्रतार, भोजराज वंजारी, राकेश बडवाईक, विकास बडवाईक, फिरोज पठाण, भरत चन्ने, अनील पडोळे, मारोती समरीत, लिलाधर कुकडे, नितीन ढबाले, नितीन राऊत, ललीत ठाकरे, संजय डोये, नितेश काबंळे, दिनेश पडोळे, अरुण डांगरे, रवी बडवाईक, लोकेश चावके व अन्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *