तुमसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप खोकल्यासारखे आजार उफाळून येत असतानाच शहराच्या कानाकोपºयात घोंगावणाºया डासांनी नागरिकांची झोप उडविली आहे. रात्री आणि दिवसादेखील घोंगावणाºया डासांपासून सुटका करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नियमित धूर आणि औषध फवारणी करण्याची मागणी शिवसेनेने मुख्याधिकाºयांना दिलेल्या निवेदातून केली आहे. साचलेले पाणी, जागोजागी दिवसभर साचलेला कचरा, सांडपाण्याने भरून वाहणारी गटारे आणि नाल्या यामुळे शहरात डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण होत आहे. यामुळे आठवड्यातून दोनदा धूर फवारणी आणि दोनवेळा औषध फवारणी करणे गरजेचे असले तरी या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.
उघड्या खिडक्या, दरवाजांतून हे डास घरातयेत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मैदाने, बगीचामध्ये तर संध्याकाळी आणि रात्रीच नव्हे तर दिवसाही डास घोंगावत असल्यामुळे लहान मुलांसह मोठया माणसांनाही या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील कचरा नियमित उचलण्यासह पाणी साचणाºया आणि कचरा साचलेल्या ठिकाणी नियमित फवारणी केल्यास डासाच्या अळ्या नष्ट होऊ शकतील. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
त्यामुळे करदात्या नागरिकांनी होणाºया त्रासाबद्दल आवाज उठविल्याखेरीज प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव होत नसून नागरिकांनी फवारणीची मागणी केल्यानंतरच प्रशासनाला फवारणीची आठवण होणार का, असा प्रश्न केला जात आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकाºयांना निवेदन सादर करताना शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख पुष्पक त्रिभुवनकर, ईशान शेंदरे, निखिल कटारे, विवेक भोगे, स्वप्निल बडवाईक, योगेश चिंधालोरे, रितेश शेंडे, दीपक मलेवार, निखिल कुंभलकर सह शहवासीय उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *