तीर्थक्षेत्र गायमुख नाल्यातून अवैध वाळू चोरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दहेगाव-रोहना गावाजवळून वाहणाºया गायमुख नाल्यातून दहेगाव येथील वाळू चोरट्या कडून मोठ्या प्रमाणात पहाटे वाळू चोरी केल्या जात आहे. याकडे पोलीस विभाग मोहाडी व तहसीलदाराचे पुर्णता दुर्लक्ष आहे. पोलीस विभाग व महसूल विभागाला हप्ता मिळत असल्याने दोन्ही विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. रोहना ते दहेगाव रस्त्याच्या मधातून इलेक्ट्रिक डीपी जवळून एक पांदन रस्ता आहे, त्या पांदन रस्त्याने दहेगाव येथील वाळू तस्कर गायमुख नाल्यात ट्रॅक्टर नेऊन तेथून वाळू उपसा करीत आहेत. तसेच एकलारा पुला जवळूनही याच नाल्यातून वाळू चोरी केल्या जात आहे. दहेगाव येथील वाळू तस्कर पहाटे ३ वाजता पाच ते सहा ट्रॅक्टर ने वाळू चोरी करतात, आणि ते वाळू भरलेले ट्रॅक्टर पोलीस स्टेशन समोरून नेऊन मोहाडीत चढ्या भावाने वाळू विकतात. बाहेरील पोलीस ट्रॅक्टर पकडू नयेत म्हणून हे वाळू तस्कर कुशारी फाट्यावर जागत असतात. मागे गायमुख नाल्याला पूर आल्याने पुरा बरोबर बारीक आणि पांढरी शुभ्र वाळू वाहत आली.

याच संधीचा फायदा दहेगाव येथील वाळू तस्कर घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी भंडाºयावरून येवून अवैध रेती भरलेले ट्रक्टर पकडतात, मात्र मोहाडी पोलीस आणि महसूल विभाग यांना हे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकाना पडला आहे. स्थानिक पोलीसानाही अवैध धंदे दिसतात पण ते जाणून पैश्याच्या लोभापायी आंधळे बनतात. हे वाळू माफिया ट्रक्टरद्वारे खुलेआम मोहाडी येथे वाळू आणून चढ्या भावाने विक्री करतात. रात्रंदिवस येथे अवैध वाळू व्यवसाय सुरू असूनही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही. अनेक तक्रारी गावकºयांनी केल्या मात्र वरीष्ठ अधिकाºयांनी सुद्धा लक्ष दिले नाही. कारवाई होत नसल्यानेच अवैध धंदयावाल्याचे मनोबल वाढलें आहे. जिकडे – तिकडे वैध वाळू घाट बंद असल्याने अवैध वाळू घाटवाल्याचे चांगलेच फावले आहे. रात्रंदिवस अवैध वाळू वाहून नेणाºया वाहनामुळे रोहना ते दहेगाव या नवीन रस्त्याची दुरावस्था झाल्याने व रस्त्याजवळील शेतातील उभे पीक धुळीमुळे नष्ट होत असल्याने हा अवैध वाळू व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामवाशीयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.