राजू भेदे यांचे निधन

भंडारा : महिनाभरापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर येथे अपघातात जखमी झालेल्या इसमाचा नागपुरातील न्युरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरूवारला सायंकाळी निधन झाले. राजू मोतीराम भेदे (५८) रा.टाकळी (भंडारा) असे मृतकाचे त्यांचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांनी प्रतिसाद दिला परंतु, दोन दिवसांपासून प्रकृती खालावली. यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा आप्त परिवार आहे. सनμलॅगचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते अरूण भेदे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारला दुपारी २ वाजता टाकळी (खमाटा) घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.