जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर ऐन कापणीच्या आणि मळणीच्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे खचलेल्या शेतकरी बांधवाला धीर देण्याकरीता शासनाने जिल्हा प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश देवून, पुढील महिन्याभरात शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे निवेदनातुन करण्यात येत आहे. भंडारा जिल्हयात खरीप हंगामातील शेतकरी बांधवांचे प्रमुख पीक हे धानपीक असते. तरी कमी जास्त पावसामुळे, पीकांवरील रोगांमुळे दरवर्षीय शेतकरी बांधवांच्या हातात पूर्णपणे पीक येत नाही. यावर्षी सुध्दा सुरवातीच्याकाळात पावसाने दगा दिला नसला तरी नंतर मात्र खोडकीडा, करपा, पेरवा यासारख्या रोगांनी बºयाच ठिकाणी आक्रमण केल्यामुळे उत्पादनावर फरक पडून शेतकरी बांधवांच्या हातात जवळजवळ अर्थच पीक होण्याची चिन्हे असतांना धान कापणीला, मळणीला जिल्हयात सर्वत्र सुरवात झालेली होती. परंतु दोन दिवसापासून ढगाळ वातावरणानंतर मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर ला रात्रीपासून आणि दिवसभर झालेल्या पावसामुळे शेतात पाणी जमा झाले. त्यामुळे ज्या शेतकºयांनी कापणी करून सुकण्यासाठी शेतात ठेवलेले बान पुर्णपणे ओले झाले असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे.

याशिवाय जिल्हयात रब्बी हंगामाची सुध्दा सुरवात झाल्यामुळे उगवलेल्या रब्बी पिकांची, तसेच बागायतदार शेतकरी जे भाजीपाल्याचे उत्पादन घेतात, त्यापिकांना सुध्दा हया अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असल्यामुळे जिल्हयातील शेतकरी बांधव पुरता खचलेला असून भविष्यात जिल्हयातील शेतकरी बांधवांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये याकरीता झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून महिनाभरात नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळावी, त्याचप्रमाणे दोन महिन्याअगोदर सुध्दा अतिवृष्टीमुळे जिल्हयात बरेच नुकसान झालेले होते, त्याचे पंचनामे सुध्दा झालेले होते. परंतु अजुनपर्यंत शासकीय मदतीपासून जिल्हयातील शेतकरी वंचित आहे. त्यामुळे पंचनामे केवळ दिखाव्यासाठी न करता, शेतकरी बांधव भविष्यात जगला पाहिजे या उदात्त हेतूने त्वरीत मदत देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे पदाधिकारा व कार्यकत्यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *