अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना मदत द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील जवळपास शेकडो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकºयाची आजची स्थिती पाहता नियम,अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकºयांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी. शेतकरी हा सातत्याने संकटात भरडला जात आहे. यावर्षी जिल्ह्यात कमी पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे, खरिप पुरता वाया गेला आणि आता रब्बी हंगामानेही घात केला आहे, शेतकºयाचे हे वर्षच नुकसानीचे ठरले आहे. अवकाळी पावसाने शेतातील धान पिके वाया गेली आहेत. जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयाला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. दुष्काळाचा सामना करत असताना आता अवकाळी पावसाने शेतकरी पुरता निराश झाला आहे. सरकारने शेतकºयाला तात्काळ मदत करुन आधार दिला पाहिजे. पिकविमा कंपन्यांकडूनही नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी.या आशयाचा निवेदन आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना देण्यात आला. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष आजबले, कलाम शेख,जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव प्रमोद तितिरमारे,भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष शिवा गायधने,लाखणीचे अध्यक्ष योगराज झलके, राजेश हटवार, आकाश कोरे, प्यारेलाल वाघमारे,पूजा ठवकर,अनिता भुरे, विजय कापसे,संदीप बांते,सुमेध मेश्राम, सुधीर चेटुले,राजेश हलमारे,जावेद लध्दानी, प्रकाश देशमुख, बिट्टू सुखदेवे, बालू ठवकर,राधे भोंगाडे, सतीश सार्वे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *