बसपा,वंचित व अपक्षांमुळे कॉंग्रेसची डोकेदुखी

प्रतिनिधी भंडारा :- देशांतर्गत होणाºया लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात भंडारागोंदिया जिल्ह्यातील निवडणुक पार पडत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकुण १८ उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीत बसपाने तेली समाजाचा तर वंचित बहुजन आघाडीने ढिबर समाजाचा उमेदवार दिला आहे तर कुणबी समाजाचे असलेले माजी आमदार सेवक वाघाये हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पुर्वी सरळसरळ असलेली निवडणुक आता रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. यामध्ये कुंभलकर, केवट व वाघाये हे काँग्रेस उमेदवाराचे टेंशन वाढविणार काय? अशी जनतेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोघांमध्येच खरी लढत होईल असा कयास लावला जात होता मात्र बसपा,वंचित व अपक्ष यांनी या निवडणुकीत खरी रंगत निर्माण केली आहे. बसपा ने यापुर्वीच्या निवडणुकीत ५० हजार पेक्षा अधिक मताधिक्य घेतले आहे तर वंचित ने सुध्दा मागील विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मताधिक्य घेतल्याने वंचितला डावलुन चालणार नाही. यासह अपक्ष उमेदवार असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी मागील वेळी साकोली विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करीत वंचितच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती तेच सेवक वाघाये यावेळी पुन्हा लोकसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. आता बसपाच्या उमेदवारीने निवडणुकीत चांगलीच रंगत वाढणार आहे.

विशेष म्हणजे बसपाने तेली समाजातील उमेदवार उभा केल्याने चुरस अधिक वाढली आहे. भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना दुसºयांदा संधी दिली तर काँग्रेसने नवा गडी, नवा डाव हे सूत्र लावत डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. मात्र शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीने संजय कुंभलकर यांना, तर वंचित बहुजन आघाडीने द्विवर समाजातील संजय केवळ यांना उमेदवारी दिली असुन भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघ हा विद्यमान खासदाराने केलेल्या विकासाला मत देते की इतरत्र कूठे आशीर्वाद देते हे मतदानातुन पुढे येईलच. दोंन्ही उमेदवारांनी केलेले प्रचाररथ पूर्ण भंडारा आणि गोंदिया जील्हयात जात असुन मोठे सभा स्टार प्रचारक आदिचे माध्यमातुन शक्तिप्रदर्शन लक्षवेधक ठरत आहे.असे असले तरी या मतदार संघात कुणबी, पोवार, तेली समाजाची सर्वाधिक मते आहेत. या तिन्ही समाजांच्या मतांच्या समीकरणावरच विजयाचे बरेच समीकरण अवलंबून आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *