भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी गोंदियात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा हे शुक्रवार १२ एप्रिल रोजी जिल्हा दौरावर येत असून ते शहरातील सर्कस मैदान येथे दुपारी ३.१५ वाजता सभेला संबोधित करतील. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.