अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्यात गारपीट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात आज १९ मार्च रोजी अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात गारपीट तसेच उर्वरित तालुक्यात वादळी वाºयासह तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळेवातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मागील दोन दिवस जिल्ह्यात दिवसा उनसावल्यांचा खेळ तर रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. आज, १९ मार्च रोजी सडक अर्जुनी येथे व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली, भरनोली व तुकूमनारायण परिसरात वादळी वारा, गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. तसेच गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व सालेकसा तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयासह तुरळक पाऊस झाला. तर देवरी व आमगाव तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण, पाऊस व गारपीटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे तसेच आगामी एक, दोन दिवस पावसाचे संकेत असल्याने मका, गहू, भाजीपाला नुकसान होण्याची भीती शेतकºयांना लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *