साकोली तालुक्यात पावसासह गारपीट तर जिल्ह्यात पाऊस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आज १९ मार्च रोजी संध्याकाळी आलेल्या अवकाळी पावसासह तालुक्यातील काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील पळसगाव सोनका या परिसरातील गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यात शेतकºयांनी उन्हाळी धान पिकासह फळभाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे अवकाळी पावसाचा व गारपीटीचा फटका शेतकºयांच्या पिकांवर बसला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.