स्तूप प्रदक्षिणा व बुद्ध वंदना समारोह ३ फेब्रुवारीला

पवनी : स्तूप संवर्धन समिती तालुका पवनी द्वारा ३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता बुद्ध अस्थी करंडक स्तूप जवळ चांडकापूर पवनी येथे स्तूप प्रदक्षिणा व बुद्ध वंदना समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत सत्यधम्मो महाथेरो, भदंत नागसेन महाथेरो, भदंत विनयबोधी महाथेरो, भदंत महेंद्ररत्न, भदंत सुमेध नागरत्न, भन्ते एस. नागसेन, भंते महेंद्र जोति, भंते सूर्य ज्योती, भंते विनयशील, भंते बोधी धम्मकीर्ती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नीरज बोधी, डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, प्रा. जावेद पाशा, प्रा. माधुरी गायधनी यांची उपस्थिती राहणार आहे.

तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मानवतावादी बुद्ध धम्माचा संदेश देणारे, सर्व मनुष्य समान असल्याचे अभिवचन देणारे पवित्र प्रेरणास्थान बुद्ध अस्थी करंडक स्तूप चांडकापूर येथे सन २०१६ पासून दरवर्षी ३ फेब्रुवारीला स्तुपाचा पुनरुत्थान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पवनी परिसरातील प्राचीन कालीन समृद्ध व संपन्न वैभवशाली बुद्धाचा इतिहास काळाच्या ओघात विस्मृतीत गेला होता. त्याला प्रज्वलित करण्यासाठी आणि युगे न युगे इथे दडपलेल्या हुंकाराला आसमंतात गुंजू देण्यासाठी परिवारासह जनतेनी स्तूपास भेट देऊन प्रदक्षिणा घालतांना वंदनेत सहभागी व्हावे तथा मान्यवरांचे प्रबोधन ऐकावे तसेच कार्यक्रमात शुभ्र वस्त्र परिधान करून सहभाग नोंदवण्याचे आव्हान आयोजन समितीने केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *